Thursday 23 June 2011

तोडफोड आंदोलन करण्याचा इशारा

Tuesday, April 26, 2011
पारोळा -  तालुक्‍यात खुलेआम विविध अवैध धंदे सुरू आहेत. हे अवैध धंदे 30 एप्रिलपर्यंत बंद न केल्यास तोडफोड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छावा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक शरद घुगे यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनाचा आशय असा : पारोळा तालुक्‍यात सद्यःस्थितीत सर्रास अवैध धंद्ये सुरू आहेत. विशेषतः सट्टा (मटका), जुगार, गावठी दारू अड्डे, पैसे लावून खेळविण्यात येणारा कॉइन गेम असे अनेक अवैधधंदे शहरासह तालुक्‍यात बोकाळले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, तरुणी व ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी शहरासह तालुक्‍यातील सर्व अवैध धंदे 30 एप्रिलपर्यंत बंद न केल्यास एक मेस (महाराष्ट्र दिनी) अखिल भारतीय छावा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते स्वतः हातात दंडुके घेऊन सुरू असलेले हे अवैधधंद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करतील. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्‍न निर्माण झाल्यास, तसेच होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहील, अशा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नेरकर, तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष दिनेश पाटील, तालुका संपर्कप्रमुख विजय भिला पाटील, डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फॅक्‍सद्वारे पाठविण्यात आल्या आहे

No comments:

Post a Comment